‘भाजपा’सोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे खरं !

0
IMG_20211102_111719

‘भाजपा’सोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे खरं !

मुंबई, दि. ३० डिसेंबर :
२०१९ मध्ये भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे पवारसाहेबांनी सांगितले हे खरं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक म्हणाले, भाजपने सरकार बनवण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पक्षातंर्गत बैठक होऊन भाजपसोबत सरकार न बनवण्याचा निर्णय झाला आणि हे शरद पवार यांनी मोदींना संसदेच्या संयुक्त सभागृहात सांगितले त्यावेळी मी उपस्थित होतो, हे सत्य आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवण्याचा भाजपचा आग्रह होता मात्र या आग्रहाला पवार य यांनी स्पष्ट नकार दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *