Ads

-

मुंबईतील ५०० चौ़रस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ !

By Xtralarge News

December 29, 2021 2:38 pm

Ads

मुंबईतील ५०० चौ़रस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ !

मुंबई, दि. २९ डिसेंबर :

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका आहे. लवकरच यासंदर्भातील निर्णय सरकार घेणार आहे अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेत दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तावाशी राज्य सरकार सहमत आहे. मात्र केवळ सामान्य करात सूट न देता मालमत्ता, सेवाशुल्कासह हा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सरकारने महानगरपालिकेचा करवाढीचा प्रस्ताव फेटाळला आह़े  त्यामुळे पालिकेला वर्षांला एक हजार कोटींचा फटका बसणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment