आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार!

0
99999 kk

आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार!

मुंबई, दि. २७ डिसेंबर :

भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून रात्रीपासून ते अज्ञातवासात आहेत. संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंवर कारवाई करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध घेतला आहे.

आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. कोणत्याही आरोपीला पोलिसांकडून सोडले जाणार नाही असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.

संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी चाकूने वार केल्याने ते जखमी झाले होते. रविवारी कणकवली पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. अर्धा तास चौकशी करुन त्यांना जाऊन देण्यात आले होते.

दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आवाजावरूनही नितेश राणे अडचणीत आले आहेत. आमदार नितेश राणे यांना निलंबित करावे या मागणीसाठी शिवसेना आमदार विधानसभेत आक्रमक झाले होते. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर दोन्हीकडून कारावईसाठी दबाव वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *