महात्मा गांधींना शिवागाळ करणाऱ्यावर कारवाई करा

0
Nawabbhai 55

महात्मा गांधींना शिवागाळ करणाऱ्यावर कारवाई करा..

मुंबई दि. २७ डिसेंबर :

छत्तीसगड येथे फर्जीबाबा कालिचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना शिवागाळ केली असून हे देशातील जनता सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

नवाब मलिक पुढे म्हणाले की, अशा वक्तव्यांना देश कधीही सहन करणार नाही. तसेच गोडसेचे महिमामंडन होत असताना आता मोदी सरकार आल्यावर देशात महात्मा गांधीजींना शिवागाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.

कालिचरण महाराज अकोल्याचे असल्याची प्राथमिक माहिती असल्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या महाराजांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा नवाब मलिक यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *