Ads

--

जानेवारीत  ‘यांना’ कोरोना लस व बुस्टर डोस !

By Xtralarge News

December 26, 2021 3:47 pm

Ads

जानेवारीत  ‘यांना’ कोरोना लस व बुस्टर डोस !

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा..

नवी दिल्ली, दि. २६ डिसेंबर:

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अजून १०० टक्के लोकांनी घेतलेले नाहीत. दुसरीकडे ओमायक्रॉन विषाणुचे संकट उभे ठाकले आहे. बुस्टर डोस देणे तसेच १५ वर्षांवरील मुलांना लस देण्याची मागणी केली जात होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

नवीन वर्षात म्हणजे ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन वर्कर्सना व ६० वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस देण्याची घोषणाही केली आहे. हा बुस्टर डोस १० जानेवारीपासून देण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी ओमायक्रॉनच्या संसर्गाबद्दल नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “कोरोना अजून संपलेला नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि वयोगट ठरवून मोहीम राबवली. आपल्या लसीकरण मोहीमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत. या निर्णयामुळे करोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंताही कमी होईल.

No comments to show.

Leave a Comment