Ads

प्रेम, दया, क्षमा शांतीची येशूची शिकवण आपण पुढे नेऊया !

By Xtralarge News

December 25, 2021 12:47 pm

Ads

प्रेम, दया, क्षमा शांतीची येशूची शिकवण आपण पुढे नेऊया !

छगन भुजबळ यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा.

मुंबई, दि. 25 डिसेंबर :
नाताळ म्हणजे पुनरुत्थानाचा प्रारंभ आहे. हा सण भगवान येशूच्या आध्यात्मिक ज्ञानाने ज्योतीने ज्योत पेटवून, दिव्याने दिवा पेटवून संपूर्ण ख्रिस्तमय वातावरणात साजरा करूया, अशा शुभेच्छा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा छगन भुजबळ यांनी ख्रिती बांधवाना दिल्या आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ख्रिस्तजयंती अर्थात नाताळ हा सण आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणून साजरा करतो. भारत हा विविध जाती, भाषा, वेशभूषेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक व्यक्ती हा संस्कृतीची जोपासना करतो. याला ख्रिस्ती धर्मही अपवाद नाही. म्हणून ख्रिस्त जयंती हा ख्रिस्ती धर्मात महत्त्वाचा सण मानला जातो. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सण असून हा सण स्वच्छता, सुंदरता, शिस्त, शांततेचे प्रतिक आहे. ख्रिस्तजन्माचा हा आनंद सर्वांना आदर्श बनू शकतो. अंधारातून प्रकाशाकडे, पापापासून पुण्याकडे, वाइटांपासून चांगुलपणाकडे, मृत्यूकडून जीवनाकडे त्याचबरोबर एकमेकांबरोबर स्नेहभाव-बंधुभाव, प्रेम-दया क्षमा शांती निर्माण करण्याची शिकवण येशूने जगाला दिली आहे. त्यांचा हा आदर्श नाताळ सणाच्या निमित्ताने आपण पुढे नेऊया असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे तसेच नव्याने ‘ओमायक्रॉन’चं नव संकट आपल्या राज्यासह संपुर्ण जगासमोर आहे. त्यामुळे यंदा नाताळचा सण उत्साहात मात्र अत्यंत साधेपणाने, घरातच साजरा करा. नाताळचा सण साजरा करताना शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करूया असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment