नाताळचा सण एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो

0
20211225_122202

नाताळचा सण एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो..

मुंबई, दि. 25 डिसेंबर :
मानव कल्याणासह जगाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृध्दी, आनंदासह उत्तम आरोग्य घेऊन येवो, समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ख्रिस्मसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराची शिकवण देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळचा सण यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे. मात्र ‘ओमायक्रॉन’चे नवे संकट आपल्या राज्यासह संपुर्ण जगासमोर आहे. त्यामुळे यंदा नाताळचा सण उत्साहात मात्र अत्यंत साधेपणाने, घरातच साजरा करा. नाताळचा सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, ती पार पाडूया, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *