ओमायक्रॉनबरोबर आता डेलमायक्रोन वायरसची भर !
ओमायक्रॉनबरोबर आता डेलमायक्रोन वायरसची भर !
मुंबई दि. २४ डिसेंबर:
राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होत आहे, त्यामुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
नवाब मलिक म्हणाले की, ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यात जगात आणखी एक नवीन डेलमायक्रोन वायरस आला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत. त्यामुळे काही निर्बंध लावायचे असतील तर ते आज काम होईल. तिसरी लाट जानेवारी ते मेपर्यंत येऊ शकते.
बंगाल, तामिळनाडूची निवडणूक झाल्यानंतर देशात दुसरी लाट आली होती. त्यामुळे हायकोर्टाने तिसरी लाट येऊ शकते म्हणून दोन, तीन महिने निवडणूका पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. निवडणूका पुढे ढकलण्याच्या नावाखाली ज्या पाच राज्यात निवडणूका आहेत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून पंजाबमध्ये सत्ता ताब्यात घेणे त्यांना शक्य होऊ शकते. निवडणूका पुढे ढकलणे हे वेगळे संकट देशात निर्माण होऊ शकते त्यामुळे काही निर्बंध घालून मर्यादित डोर टू डोर प्रचार कोरोना नियम पाळून निवडणूका होऊ शकतात यावर केंद्र सरकारने विचार करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
