… मग अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेता करणार का?
… मग अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेता करणार का?
मुंबई, दि. २२ डिसेंबर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा उल्लेख केल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
रश्मी ठाकरे या राजकारणात नसताना त्यांचे नाव चंद्रकांत पाटील टीका करताना का घेतात असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विरोधी पक्षनेता बनवा, असा खोचक सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला.
पेडणेकर म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील मोठे नेते आहेत पण कधी कधी मला त्यांची कीव करावीशी वाटते. माझ्यासारख्यांनी त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी नाही बोलले पाहिजे असे माझ्या पालकांचे, गुरुंचे आणि बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण ते जर एक पत्नी म्हणून रश्मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर अमृता फडणवीस यांना ते विरोधी पक्षनेता करणार आहेत का हे सांगावे. कारण अमृता फडणवीस या जास्त प्रकाशझोतात आहेत. रश्मी वहिनी कधीच प्रकाशझोतात नसतात तरी त्यांचे नाव घेतले जाते.
