महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘डीबीटी’ सरकार!

0
IMG_20211220_112801

महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘डीबीटी’ सरकार!

पुणे, दि. २० डिसेंबर:

गरजूंना थेट मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ योजना सुरू केली. या योजनेची व्याख्या महाविकास आघाडीने बदलली. काँग्रेस डीलर, शिवसेना ब्रोकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्रान्सफरमध्ये पैसे घोटाळा असा त्याचा अर्थ केला आहे. त्यामुळे हे ‘डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर बिझनेस’चे सरकार आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

पुण्यातील सभेत बोलताना अमित शहा पुढे म्हणाले की,
महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीनचाकी रिक्षा आहे. या रिक्षाची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशेला आहेत, केवळ चाके वेगवेगळ्या दिशेला नाहीत तर चाके पंक्चरही आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्याला अधोगतीकडे नेत आहे. हे सरकार राज्याला गतवैभव मिळवून देऊ शकत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *