करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीमध्ये एक मंत्री होते का?
करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीमध्ये एक मंत्री होते का?
मुंबई, दि. 16 डिसेंबर:
निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीत असलेल्या तिघांना कोरोना झाला अशा बातम्या वाचल्यानंतर माहिती मिळाली की, सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाला. याबाबत महापालिकेला पत्र लिहून प्रश्न विचारले
असता संभ्रम निर्माण करणारी उत्तरं मिळाली. ज्या पध्दतीने संभ्रमाचे वातावरण दिसते आहे त्यावरून पालिकेला असा सवाल आहे की, या पार्टीत राज्य शासनातील कोणी मंत्री होता का? असा सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक सहभागी होती?. त्या सर्वांची टेस्ट झाली का?, मनपाचे अधिकारी सांगत आहेत त्या पार्टीत आठच लोक होते, हे आठच लोक होते हे कशावरून ठरवले? असे मी प्रश्न पालिकेला विचारले. यावर पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले की, आम्ही बाधीत लोकांशी चर्चा केली. सीमा खान त्यांनी काही नावे सांगितली, काही नावे गाळली होती लपवली होती. मग अधिकारी म्हणाले, की आम्ही स्वतः करिना कपुर यांच्याशी बोललो. त्यांनी काही नावे सांगितली. यावरून असे दिसतेय की, यामध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. म्हणून आम्ही पालिकेला प्रश्न विचारला आहे की, सदर इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे का?, ही पत्रकार परिषद घेईपर्यंत पालिकेने उत्तर नाही असे दिले आहे. त्यामुळे संशय बळावतो आहे. हा संशय बळावयाचे नसेल तर त्या इमातीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जी माहिती समोर आली त्यामध्ये त्या पार्टीमधील अन्य लोकांनी पालिकेकडून टेस्ट केलेल्या नाहीत. त्यांनी हरकिशनदास रूग्णालयात चाचण्या केल्या आहेत.
या पार्टीत किती लोक होते ?असा संदेह निर्माण होत आहे, त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्याने पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होतं का त्याची स्पष्टता असावी, जन आरोग्याची खेळू नये, असेही आमदार आशिष शेलार म्हणाले.
