Ads

----

राम मंदिर भूमिपूजनावेळी आनंदोत्सव करावा! 

By Xtralarge News

August 3, 2020 7:04 pm

Ads

सोलापूर, दि. 3 ऑगस्ट

अनेक वर्षांपासून संपूर्ण भारत देश ज्याची वाट पहात होता तो क्षण जवळ आला आहे. बुधवार, 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या नगरीत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रामभक्तांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे.
आ. सुभाष देशमुख म्हणाले की, राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी रामभक्तांनी आपल्या घरावर भगवा ध्वज लावावा, घरासमोर रांगोळ्या काढाव्यात, संध्याकाळी दीपोत्सव करावा. हे करताना सध्या आपण कोरोनाच्या महामारीतून जात आहे, याचेही भान ठेवत शासनाचे सर्व नियम पाळून हा आनंदोत्सव साजरा करावा. आपणही वडाळा येथे नवीन बांधण्यात येणार्‍या राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहोत. यादिवशी रामभक्तांनी जे काही चांगले उपक्रम आहेत ते राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment