Ads

--

… ही तर महाराष्ट्रातील पुढच्या विजयाची नांदी !

By Xtralarge News

December 14, 2021 1:53 pm

Ads

… ही तर महाराष्ट्रातील पुढच्या विजयाची नांदी !

नागपूर, दि. १४ डिसेंबर:

विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा पराभव करुन आघाडीला मोठा दणका दिला आहे. विशेष म्हणजे ज्या विदर्भातून काँग्रेसला मोठा विजय मिळला होता त्याच विदर्भातून दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून येणे ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा महाराष्ट्रातील पुढच्या विजयाची नांदी आहे, अशी परखड प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता भाजपाच्या पाठिशी आहे. भविष्यातही आम्हाला पाठिंबा मिळेल. मला वाटतं बावनकुळेंचा विजय हा महाराष्ट्रातील भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. जनतेने महाविकास आघाडीला नाकारले आहे. जनता भाजपाच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. आतापर्यंत तिन्ही पक्ष एकत्र आले म्हणजे विजय नक्की हे समीकरण होते परंतु आजच्या विजयानंतर हे गणित फोल ठरले आहे.

विदर्भात काँग्रेसचे दोन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेस उमेदवाराची धुळधाण झाली. याचा अर्थ जनता भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment