Ads

--

‘गंगाने बुलाया है’ म्हणणार्‍यांनी अजून गंगा नदी स्वच्छ केली नाही

By Xtralarge News

December 13, 2021 11:43 pm

Ads

‘गंगाने बुलाया है’ म्हणणार्‍यांनी अजून गंगा नदी स्वच्छ केली नाही..

मुंबई, दि. १३ डिसेंबर :
‘गंगाने बुलाया है’ असे साडेसात वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते परंतु अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा तो मतदार संघ आहे. प्रश्न असा आहे की, साडेसात वर्षे झाली आहेत. काशीच्याबाबतीत देखील आश्वासन देण्यात आले होते मात्र त्याठिकाणी देखील काहीच झाले नाही. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरते यावरही नवाब मलिक यांनी बोट ठेवले.

आगामी निवडणुकीत कमीत कमी चार ठिकाणी पराभव पत्करावा लागणार आहे. ज्याठिकाणी ते निवडणूक लढतात तिथे आणि आजूबाजूच्या ४ जागाही निवडुन येणार नाहीत.

देशाचे पंतप्रधान कोण होतील हा विषय चर्चेला नाही. सामूहिक नेतृत्वाखाली एकजूट होण्याची तयारी सुरू आहे. काही लोकं म्हणतात की टीएमसी तुमचे आमदार फोडत आहेत. जे आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत. ते पाच वर्षापूर्वी आमच्या पक्षात आले होते की, त्यांची मागणी होती की, त्यांच्यासह त्यांच्या मुलीला देखील तिकीट मिळायला हवी. परंतु गोव्यात आमची काँग्रेससोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले असावे की, त्यांना दोन तिकीट मिळणार नाहीत असेही नवाब मलिक म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment