अमृता फडणवीस यांच्या ट्विटवरून उठले वादंग!
शिवसेनेने घेतला अमृता फडणवीस यांचा समाचार.
सोशल मीडियावरही अमृता फडणवीसांविरोधात ट्रोल!
मुंबई, दि. 3 ऑगस्ट
अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या आता वेगळे वळण घेत असून तो आता राजकीय मुद्दा बनला आहे. सुशांत च्या आत्महत्येची चौकशी मुंबई पोलीस करत असताना बिहार पोलिसही चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले पण त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने वाद सूरू झाला आहे. त्यातच या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. यावर आक्षेप घेत मुंबई पोलिसांवर भाजपाला विश्वास नाही का, त्यांची बदनामी का करता असा सुरूही उमटत आहे.
त्यात बिहारच्या निवडणूकीशी हा मुद्दा जोडला जात असून सुशांतची आत्महत्या एक राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.
हे सर्व होत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी केलेल्या ट्विटचेही पडसाद उमटले आहेत. अमृता आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असे ट्विट करून अमृता यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहेत.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांनी समाचार घेतला, तुम्ही आणि तुमचे कुटुंब मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावरच इतके नीच आरोप करता? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरवसा नसेल तर!, असं वरूणने या ट्विटमध्ये म्हटलंय..
सोशल मीडियातही अमृता फडणवीस यांना या ट्विटवरून ट्रोल करण्यात येत असून याच पोलिसांच्या सुरक्षेत पाच वर्ष आपण काढली आता असुरक्षित वाटत असेल तर बिहारमध्ये जावे. याच पोलीसांनी तुमच्या कार्यक्रमाची तिकीटे विकली. जस्टीस लोया प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या, पुलवामा बाॅम्बस्फोट याची चौकशी करावी, यावर ट्विट का करत नाहीत, असे प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.

