शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारावरच काम करतो !
शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारावरच काम करतो !
मुंबई, दि. १२ डिसेंबर :
शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पवार म्हणाले की, आमचा पक्ष एका विचाराने देशात आणि राज्यात काम करतोय. बांधिलकी असलेले कार्यकर्ते पक्षात आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा पक्ष आहे. लिहिणारे, वाचणारे, अभ्यास करणारे, लिखाण करणारे लोक सध्या फार आहेत. दिनदुबळ्यांचं, पददलितांचं, वंचितांचं दुःख ऐकून आमच्या पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होतो असेही शरद पवार यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी पुढचा विचार त्यावेळी केला होता. बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढची होती. देशातील मोठया धरणातून शेती व वीज निर्मिती केली पाहिजे हा विचार त्यांनी अगोदर मांडला होता याची माहितीही त्यांनी दिली. समाजकारण, राजकारण बदलत आहे परंतु महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. तर इतर घटनांचा उहापोहही यावेळी केला.

पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणजे…वंचिताचा… महिलांना हक्क मिळवून देणार्या… कर्मयोग्याचा वाढदिवस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारसाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रत्येक कार्यक्षेत्रावर पवारसाहेबांचा ठसा आहे. या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची आहे. पवारसाहेब आपली प्रेरणा आणि स्फूर्ती आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दिल्लीत पवार यांचा ७५ वा वाढदिवस पार पडला त्यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधानांपासून सर्वच लोक आपले राजकीय मतभेद विसरत उपस्थित राहिले होते. एवढ्या लोकांना एका छताखाली आणणे सोपे नाही ही किमया फक्त पवारच करू शकतात आणि हीच त्यांची खरी कमाई आहे असे खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कृषीमंत्री असताना पवारांनी जे काम केले त्या कामाची आठवण काढत आजही देशातील शेतकरी पवार यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, प्रतिभाताई पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,खासदार डॉ. अमोल कोल्हे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार माजिद मेमन, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक सेलचे जयदेव गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
