प्रबोधनकारांवर लघुपट लवकरच!

0
IMG-20211209-WA0030

प्रबोधनकारांवर लघुपट लवकरच!

मुंबई, दि. 10 डिसेंबर:
मराठी भाषा विभागाच्यावतीने प्रबोधनकारांवर लघुपट तयार करण्यात येत आहे. पुढील एक दोन महिन्यात तो पूर्ण होईल. या निमित्ताने महाराष्ट्राला प्रबोधनकारांचे विचार समजणार आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

प्रबोधन नियतकालिककाचा नुकताच शताब्दी वर्ष सोहळा पार पडला. या निमित्ताने तीन खंड प्रकाशित करण्यात आले. आठवणीतील प्रबोधनकार पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे करण्यात आले.

महाराष्ट्राला पुरोगामी ही ओळख ज्या काही समाज सुधारकांमुळे मिळाली त्यात प्रबोधनकाराचा समावेश आहे. समाजातील वाईट प्रथा, रुढी, परंपरांना छेद देण्याचे काम त्यांनी केले. त्यातून आजचा समाज घडला. त्या सर्व कार्याची माहिती ‘आठवणीतील प्रबोधनकार’ या पुस्तकातून मिळते. हा ठेवा महाराष्ट्राला कळण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असे श्री. देसाई म्हणाले.

यावेळी आमदार भास्कर जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, पुस्तकाचे लेखक विजय वैद्य, मार्मिक चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, महेश म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *