डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करूया   

0
athawale photo 1

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करूया..

मुंबई दि. ६ डिसेंबर :

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील समतावादी भारत साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धमय भारताचे पाहिलेले स्वप्न आणि त्यांनी प्रबळ राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनतेला खुले पत्र लिहुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली होती. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी रामदास आठवले यांनी चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन केले.

रामदास आठवले म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगाला मार्गदर्शक आहेत. त्यांचे भाषण आणि लेखनाचे 22 खंड प्रकाशित झाले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य राज्य शासन प्रकाशित करण्यात चालढकल करीत आहे. त्यासाठीचा 5 कोटींचा कागद धूळ खात पडला आहे, ही निषेधार्ह बाब आहे. राज्य सरकार ने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन साहित्य त्वरित प्रकाशित करणे सुरू करावे अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *