Ads

-

कविवर्य कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध का ?

By Xtralarge News

December 6, 2021 9:32 am

Ads

कविवर्य कुसुमाग्रजांच्या नावाला विरोध का ?

नाशिक, दि. 6 डिसेंबर:

सभामंडपाला कुसुमाग्रजनगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहेत. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले.

संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव दिले नाही म्हणून भाजपा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी केली होती त्याचा समाचार घेत भुजबळ म्हणाले की, कारण नसतांना देखील विरोध केला याचं दुःख आहे. नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे असा टोला त्यांनी लगावला. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. हा उत्सव संपल्यावर आपल्याला गणेशोत्सवाप्रमाणे चुकल्या चुकल्यासारखे वाटणार आहे. नाशिकला येत चला नाशिकला पुन्हा संमेलन होऊद्या अशी गळ साहित्य मंडळाला घातली. तसेच समतेची ही संस्था आपल्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. आपण परत परत नाशिकला या असे आवाहन त्यांनी साहित्यिकांना केले.

कोरोनामुळे संमेलनासाठी उशीर झाला. संमेलन घेणे आवश्यक असल्याने महिन्यांपूर्वी संमेलन घेणे हे ठरलं आणि रात्रंदिवस तयारी केली. यासाठी सर्वांचे हातभार लागला. यामध्ये साफसफाई कामगारांच्या विशेष योगदानाबद्दल आभार. तसेच भोजन व्यवस्था, डॉक्टर, सजावट, चित्रकार, शिल्पकार, रांगोळीकर, फुलांची सजावट, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, महापौर ,पोलीस यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, उद्योजक चांदे, निधी दिलेले सर्व आमदार, महाराष्ट्र शासन, सर्व देणगीदार, उद्योजक चंदे, बालकवी, गझलकार, साहित्यिक, मराठी साहित्य मंडळ, लोकहितवादी मंडळ, मेट भुजबळ नॉलेज सिटी, मराठी भाषा विभाग सर्व पाहुणे, प्रेक्षक, माध्यमे या सर्वांसोबत हे कसं होणार, काय होणार यावर अनेक चर्चा झाली. मात्र उपस्थिती बघितल्यावर या जागेचा निर्णय घेतला त्याबद्दल लोकहितवादी मंडळ आणि महामंडळाचे आभार यावेळी छगन भुजबळ यांनी मानले.

No comments to show.

Leave a Comment