Ads

--

… ‘असे’ पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात?

By Xtralarge News

December 1, 2021 10:29 pm

Ads

… ‘असे’ पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात?

ममतांचे नाव न घेता बाळासाहेब थोरातांची टीका..

मुंबई, दि. १ डिसेंबर:

काँग्रेसला वगळून भाजपाविरोधात देशपातळीवर आघाडी स्थापन करण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. ममतांच्या या भूमिकेवर काँग्रेसमधून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपला मदत होईल अशी भूमिका घेणारे पक्ष भाजपला पर्याय कसा ठरू शकतात? असा प्रश्न महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.

थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा दिला आहे. राहुल गांधी आणि संपूर्ण कुटुंबियांवर यादरम्यान भाजप आणि इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत.

देशातील गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच आज देशातील जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.

No comments to show.

Leave a Comment