Ads

-

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एका वर्षाची मुदतवाढ

By Xtralarge News

November 30, 2021 10:19 am

Ads

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एका वर्षाची मुदतवाढ

मुंबई, दि. 30 नोव्हेंबर :
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकाला त्या व्यक्तीस वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल अशी व्यक्ती ती निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून 12 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र देईल. त्यात कसूर झाल्यास त्या व्यक्तीची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी अशी तरतूद देखील करण्यास आज मान्यता देण्यात आली.

No comments to show.

Leave a Comment