महात्मा फुलेंच्या विचारांवर छत्तीसगढची वाटचाल !

0
baghel

महात्मा फुलेंच्या विचारांवर छत्तीसगढची वाटचाल !

‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव.

मुंबई, दि. २८ नोव्हेंबर

देशातील सर्व शासकीय प्रकल्प विकण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जात आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्या कमी झाल्या आहेत. आपल्याला २७ % आरक्षण जरी मिळाले तर शासकीय नोकरीच मिळणार नाही. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात लढावे लागेल. आरक्षण वाचविण्यासाठी छत्तीसगढ राज्यात ओबीसींची जनगणना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की,  महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारणेच्या कामाची सुरुवात या भावनातून झाली. समाजातील वंचित पिडीत शोषित घटकाला न्याय देण्यासाठी सर्व काही पणाला लावले. महिलांना समाजात सन्मान देण्याचे काम त्यांनी केले. वाड्यात या विहिरीत पाण्याने समाजातील वंचित घटकांची तहान भागविली त्यातून समाजक्रांती झाली. या समाजसुधारकांच्या भूमीला वंदन करतो. महात्मा फुले यांनी ६३ वर्ष समाज क्रांतीचा लढा दिला. त्यांनी लावलेली ज्योत आजही तेवत आहे. अंधविश्वासावर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

देशात साडेतीन हजार वर्षे पीडित समाजाने काम केलं. त्यामुळे जगाच्या आर्थिक उत्पन्नात भारताचा २३ टक्के वाटा होता. त्यामुळे भारताला सोने की चिडीया असे संबोधले जात होते. ब्रिटिश आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यावेळी समतेची ज्योत महात्मा फुले यांनी लावली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच महात्मा फुले यांच्या विचारांवर छत्तीसगढ राज्य कार्य करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले यांचे विचार आणि पुढे महात्मा गांधी यांनी सत्याच्या प्रयोगातून पुढे नेले. महात्मा फुले यांचे विचार महात्मा गांधींनी पुढे नेले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच विचार संविधानाच्या माध्यमातून आपणास दिले. ते संविधान आज धोक्यात आले आहे. महात्मा फुले समाजिक क्रांतीचे अग्रणी तर महात्मा गांधीजी राजकीय समाज सुधारणेचे अग्रणी होते. महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या काळात ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आज पुन्हा निर्माण झाल्या असून त्याविषयी आपल्याला लढावे लागेल असे बघेल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *