फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या भोवतीच फिरणारे आघाडी सरकार !

0
Shelar

फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या भोवतीच फिरणारे आघाडी सरकार !

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांची टीका

मुंबई दि. २८ नोव्हेंबर:

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीचे वर्णन करायचे झाले तर आघाडी सरकार फक्त “पुत्र, पुत्री आणि पुतण्या” याभोवतीच फिरणारे असल्याची टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

शेलार म्हणाले की, हे सरकार म्हणजे ’तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाप्रमाणे तीन पक्षांचा तमाशा आहे. मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही तसेच कोणता आरोप अथवा टीका ही करायचा नाही. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या त्या मांडत आहे. काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा आहे. सत्ता, संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडतो आहे.

अडचण काहीच नाही एखाद्याला आपला पुत्र चांगलं काम करावा, मोठा व्हावा असं वाटतं.त्याच्या नेतृत्वामध्ये पुढचे यश मिळाले पाहिजे. ही पायाभरणी करायला एखाद्याला वाटलं तर त्यात चूक असू शकत नाही. आपला पुत्र राजकारणात स्थिरावला पाहिजे यात चूक नाही, पण राज्यात निर्णय काय घेतले हे पहिले तर महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचं दिसतं. राज्याची जगासमोर जी प्रतिमा गेली ती पब, पेग, पार्टी आणि पेग्विन अशीच दुर्दैवी गेली. मग जेव्हा मुंबईकर लोकल ट्रेन सुरु करा असे म्हणत होते तेव्हा पब आणि बार सुरु केले गेले. जेव्हा मंदिर उघडा अशी मागणी झाली तेव्हा मदिरालाय उघडी केली, असे निर्णय पुत्रप्रेमाने झाले.

तसेच सुपुत्रीच्या प्रेमापोटी गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांना बसवले, त्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणारे वसुली, मटकाकिंग,  बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलीस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे चित्र समोर आले. महाराष्ट्राची ही वेदना आहे.

पुतण्या प्रेमाने त्यांना पुतण्याला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. पुतण्याचे काय उद्योग सांगावे? एक हजार कोटींची बेनामी संपत्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी उघड केली. कुठून आली संपत्ती? सहकारी कारखाना उघडायचा, सरकारकडुन जमीन, वीज सगळे सवलतीत मिळवायचे, शेतकऱ्यांकडून पैसा घ्यायचा, पण कारखाना तोट्यात दाखवायचा, बँकेने मग लिलाव करायचा, मग तोच कारखाना पुतण्याने विकत घ्यायचा.. असे पुतण्याचे नवीन उद्योग समोर आले.

या सरकार मध्ये सामान्य माणसाचे भले झाले नाही. अहंकार,अतर्क,असंवेदनशील कार्यपद्धती सरकारची दोन वर्षे राहिली. पेट्रोलवरील कर कमी करा अशी मागणी केली तर विदेशी दारुवरील कर कमी केला. वायनरीला सबसिडी दिली पण शेतकऱ्यांबाबत काही बोलायला तयार नाही. वीस वर्षापुर्वीच्या कार्यक्रमाचा एका एजन्सीला पैसा दिला गेला पण एसटीच्या कामगाराला द्यायला तयार नाही. रयत शिक्षण संस्थेला करोडो दिले जातात, आमचा विरोध नाही, पण शाळांना अनुदान दिले जात नाही. शाळा बंद मात्र फी वाढवली जाते. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचे बंद केले जाते. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानाचा हक्क काढून घेतला जातो लोकशाहीला मारक असे हे निर्णय का घेतले जातात?हे सगळे तर्कात न बसणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *