ड्रग्स कारवाईची माहिती देण्यास NCB कडून नकार!

0
NCM nnn

ड्रग्स कारवाईची माहिती देण्यास NCB कडून नकार!

मुंबई, दि. २८ नोव्हेंबर :

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो म्हणजे NCB ने मागील 3 वर्षात केलेल्या ड्रग्स कारवाईची माहिती RTI अंतर्गत मागितली असता ती देण्यास सपशेल नकार दिला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वेगवेगळ्या अर्जात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोकडे  माहिती मागितली होती. मागील 3 वर्षात जप्त केलेला माल, अंमली पदार्थांचा प्रकार, एकूण किंमत, एकूण गुन्हे आणि आरोपींची संख्या ही माहिती दयावी. दुसऱ्या अर्जात गलगली यांनी  विल्हेवाट लावलेल्या अंमली पदार्थांची विस्तृत माहिती विचारली होती.

अनिल गलगली यांच्या दोन्ही अर्जाला माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ चे कलम २४ चा आधार घेत माहिती देण्यास नकार दिला. अनिल गलगली यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केल. एनसीबी अधिकारी स्वतःहून प्रसार माध्यमातून अंमली पदार्थांची इत्यंभूत माहिती देतात आणि विविध दावा करतात. मग माहिती अधिकार कायद्यात नागरिकांना माहिती देताना टाळाटाळ का करतात? मुंबई पोलीस अश्या प्रकाराची माहिती सहजरित्या उपलब्ध करते मग एनसीबी तर्फे टाळाटाळ केली जाणे गैर आहे. अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून मागणी केली आहे की याबाबत स्पष्टता आणत अश्या कारवाईची माहिती संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक नागरिकांला जप्त केलेला माल आणि त्याच्या विल्हेवाटाची माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *