संमेलनासाठी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये लगबग !
नाशिक, दि. २७ नोव्हेंबर
नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी जर्मन पद्धतीचा मंडप घालण्यात येत असून अतिशय मजबूत स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येत आहे. भव्यदिव्य असलेल्या या सोहळ्यासाठी अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून हे सर्व कामकाज ३० तारखेच्या आत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी माहिती
साहित्य संमेलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्य सभामंडप उभारणीच्या कामांची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली. साहित्य संमेलनाची संपूर्ण तयारी ३० तारखेपर्यंत पूर्ण करा अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर होणारे कार्यक्रम मुख्य स्टेजवर करण्यात येणार आहेत. त्यातून सर्व तांत्रिक बाबींची तपासणी देखील होणार आहे. संपूर्ण नाशिकचा हा उत्सव असून बऱ्याच काळानंतर नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात नाशिककरांनी सहभागी होऊन उत्साहात सारस्वतांचे स्वागत करावे असे आवाहन त्यांनी केले.
Leave a Comment