Ads

--

मार्च ही जास्तच मुदत दिल्याबद्दल राणेंचे आभार !

By Xtralarge News

November 27, 2021 12:47 pm

Ads

मार्च ही जास्तच मुदत दिल्याबद्दल राणेंचे आभार !

सरकार पडण्याच्या भाकितावर राष्ट्रवादीचा टोला

मुंबई दि. २७ नोव्हेंबर :

गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.

नारायण राणे यांनी आघाडी सरकार मार्चपर्यंत जाणार असे भाकीत केले आहे त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाकीताची खिल्ली उडवली.

आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच-सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असे वातावरण कायम ठेवावे लागते अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment