Ads

--

सोलापूर जिल्ह्यातील 69 % नागरिकांना पहिला डोस

By Xtralarge News

November 24, 2021 11:26 am

Ads

सोलापूर जिल्ह्यातील 69 % नागरिकांना पहिला डोस

सोलापूर, दि. 24 नोव्हेंबर :
सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेस सुरुवात झालेली असून 22 नोव्हेंबरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 लाख 55 हजार 640 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 89 हजार 474 इतकी आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तर कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबरोबरच कोविड पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील उर्वरित सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे व आपला जिल्हा 100 टक्के लसीकरण झालेला जिल्हा होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

जिल्ह्याच्या 100% लसीकरणासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्रशासन कामकाज करत असून सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवत आहेत. तरी सर्व संबंधित नागरिकांनी सहकार्य करावे व लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. जोपर्यंत प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होणार नाही तोपर्यंत कोविड महामारी पासून मुक्ती मिळणार नाही. तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

सोलापूर जिल्ह्याला 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे एकूण 34 लाख 14 हजार 400 इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये सोलापूर शहर 7 लाख 34 हजार 383 तर सोलापूर ग्रामीण 26 लाख 80 हजार 17 इतके नागरिकांचे लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्या अनुषंगाने दिनांक 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात देण्यात आलेला असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 लाख 55 हजार 640(69%)तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7लाख 89 हजार 474(23.1%)इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील 18 लाख 70 हजार 744 नागरिकांनी पहिला तर 5 लाख 47 हजार 182 नागरिकांनी दुसरा असे एकूण 24 लाख 17 हजार 926 ग्रामीण नागरिकांनी लस घेतलेली आहे. तर शहरी भागातील 4 लाख 84 हजार 881 नागरिकांनी पहिला तर 2 लाख 42 हजार 292 नागरिकांनी दुसरा असे एकूण 7 लाख 27 हजार 188 नागरिकांनी लस घेतलेली पासून ग्रामीण व शहरी मिळवून पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 69 टक्के तर दुसरा डोस घेतले नागरिकांची टक्केवारी 23.1 इतकी असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.

No comments to show.

Leave a Comment