येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा
येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा..
येवला दि. 20 नोव्हेंबर:
येवला शहरातील रस्ते, गटार, वीज यासह स्वच्छतेची कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
येवला शहरातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामाची आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरात सुरू असलेली विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच जी कामे मंजूर आहे ती तातडीने सुरू करण्यात यावी.आगामी निवडणुकांच्या पूर्वी शहरात राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. येवला शहरात अद्यापही लसीकरणाचा वेग कमी आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
