मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर राष्ट्रवादीत

0
IMG-20211119-WA0019

मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर राष्ट्रवादीत..

मुंबई दि. 19 नोव्हेंबर :
मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

निर्मला सामंत यांच्या प्रवेशाने पक्षाला मुंबई मनपा निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा विश्वास पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अर्बन सेल प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील, माजी नगरसेविका अल्पना पेंटर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *