परमवीरसिंग, तुम्ही कुठे आहात ? आधी सांगा मग याचिकेचे पाहू
परमवीरसिंग, तुम्ही कुठे आहात ? आधी सांगा मग याचिकेचे पाहू.
सुप्रीम कोर्टाचा परमवीरसिंग यांना मोठा झटका
नवी दिल्ली, दि. १८ नोव्हेंबर:
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांना मुंबईतील किला न्यायालयाने फरार घोषीत केल्यानंतर सुप्रीम कोर्टानेही आज मोठा झटका दिला.
फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी परमवीरसिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दखल केली परंतु सर्वोच्च न्यायालयाने परमबीरसिंग कुठे लपलेले आहेत, याची माहिती देत नाही तोपर्यंत त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला. परमबीरसिंग भारतात आहेत, की परदेशात लपले आहेत, याची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यामुळे परमवीरसिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सप्टेंबर २०२१ पासून परमवीरसिंह गायब आहेत. तपास यंत्रणांसमोर ते एकदाही हजर झालेले नाहीत. ते भारतातून पळून गेले आहेत की नाही याबद्दल शंका आहे. महाराष्ट्रात परमबीरसिंग यांच्यावर जवळपास पाच गुन्हे दाखल आहेत आणि गोरेगाव खंडणी प्रकरणात त्यांच्या नावावर अनेक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत.
सप्टेंबर २०२१ पासून परमवीरसिंह गायब आहेत. तपास यंत्रणांसमोर ते एकदाही हजर झालेले नाहीत. ते भारतातून पळून गेले आहेत की नाही याबद्दल शंका आहे.तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून परमवीरसिंह यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. यात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांन ईडीने अटकही केली परंतु आरोप करणारे परमवीर मात्र गायब झाले आहेत.
