मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा ‘मराठी कट्टा’!

0
20211118_194029

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा ‘मराठी कट्टा’!

मुंबई, दि १८ नोव्हेंबर :

मुंबईतील मराठी माणसांना भेडसावणाऱ्या समस्या मांडण्यासाठी “मराठी कट्टा” हे व्यासपीठ आयोजित केले जात असून, त्यात नागरिकांच्या समस्यांचे योग्य निराकरण केले जाते. त्याचप्रमाणे विविध समाज गटांसाठी अनेक योजना व कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबई भाजपा आपल्या एक लाख चाळीस हजार बूथ प्रमुखांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून लोकांना मदत करत आहे. मुंबईतील सर्वसामान्य जनतेला विविध समाजोपयोगी योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी पक्षाने आतापर्यंत प्रत्येक प्रभागात उत्तर भारतीय मोर्चा च्या माध्यमातून पाचशेहून अधिक चौपाल सत्राचे आयोजन केले असून भविष्यात पाचशेहून अधिक चौपाल सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

“सेवा ही समर्पण” या अभियानांतर्गत मुंबई भाजप घरोघरी जाऊन मुंबईतील नागरिकांना मदत करत आहे. यासोबतच मुंबई भाजपने विविध समाजाकरिता चौपाल हे सामाजिक व्यासपीठ आयोजित केले असून त्याच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

नवरात्री सणाचे औचित्य साधत महिलांचा सन्मान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.त्यांच मोहिमे अंतर्गत मुंबई शहरातील महिला स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. तरूणांच्या भविष्याला योग्य दिशा मिळण्याकरीता “करिअर दिशा” या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते अश्या अनेक योजना मुंबई भाजपा तर्फे आयोजित करून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार अमित साटम, आमदार मिहिर कोटेजा, आमदार पराग अळवणी तसेच मुंबई भाजपाचे सर्व जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री व मंडल अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित सर्वांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे अनुभव ऐकून मार्गदर्शन घेतले व त्यांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *