महायुतीच्या सरकारसाठी ‘आठवले फाॅर्मुला’
महायुतीच्या सरकारसाठी ‘आठवले फाॅर्मुला’
मुंबई, दि. 18 नोव्हेंबर :
शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची
यासाठी आपण भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दादर शिवाजीपार्क येथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजप शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजप ला 50 टक्के सत्तेतील सहभाग द्यावा या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
