मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह फरार घोषीत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह फरार घोषीत..
मुंबई, दि. १७ नोव्हेंबर :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना आज जबरदस्त दणका बसला. न्यायालयाने आज परमवीरसिंह यांना फरार घोषित केलं तसेच ३० दिवसांच्या कालावधीत न्यायायलया समोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळेल असे स्पष्ट केले.
गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीरसिंग यांच्यासह आणखी दोघांना देखील फरार घोषित केले. गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला होता.
परमवीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांना राजानीमा द्यावा लागला. त्यांना ईडीने अटकही केली पण परमवीरसिंह मात्र फरार झाले. परमवीर यांच्यावर या प्रकरणी चौकशी करण्यात येत असताना ते मात्र मुंबई सोडून देले. त्यांच्यावर खंडणीसह इतर गुन्हेही नोंदवण्यात आले, कोर्टानेही त्यांना समन्स पाठवले पण ते हजर राहू शकले नाहीत अखेर त्यांना फरार घोषीत कऱण्यात आले
