ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही
ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही.
जनावरांची नांवे देऊन भाजपची संस्कृती स्पष्ट..
मुंबई दि. ११ नोव्हेंबर :
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ, शरध पवार व पक्ष पाठिशी आहे. माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच..आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय असा सवालही मलिक यांनी भाजपला केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.
