Ads

-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

By Xtralarge News

November 10, 2021 8:36 pm

Ads

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल.

मुंबई, दि. 10 नोव्हेंबर:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्याचा त्रास असून त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
दोन तीन दिवस ते रुग्णालयातच असतील.

महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले असून या पत्रात ते म्हणतात की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच !
पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

No comments to show.

Leave a Comment