सुनिल पाटीलवर गुन्हा दाखल करुन तपास सीबीआयला द्या..
सुनिल पाटीलवर गुन्हा दाखल करुन तपास सीबीआयला द्या..
मुंबई, दि, 6 नोव्हेंबर :
धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षितस्थळी ठेवले? तो परराज्यातून “गेम” वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करुन या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा अशी आग्रही मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा धाग पुढे पकडून आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात बेदिली माजली आहे. दाऊदचा हस्तक आणि ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत असा रिंकू पठाण याला लाॅकडाऊन काळात सोडण्यात आले. तसेच जेव्हा राज्यात पहिला कडकडीत लाॅकडाऊन सुरु होते तेव्हा हा रिंकू पठाण सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रोटेक्शन मनी ठरवण्यासाठी भेटला. राज्यात फेसबुक आणि सोशल मिडियावर कोणी लिहीले तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात आणि दाऊदचा हस्तक गृहमंत्र्यांना सह्याद्रीवर भेटतो? सह्याद्रीचा आता वसुली अड्डा झालाय का? असा आशिष शेलार यांनी केला .
रिंकू पठाण भेटल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी हळूहळू धागेदोरे जमा करून ड्रग्ज माफियांना अटक करायला सुरुवात केली. सुमारे 20 ड्रग्ज वितरकांना अटक करण्यात आली. ही माहिती एनसीबीने एन आय ए आणि ईडीला दिली. म्हणून एनसीबीवर उट्टं काडण्यात येत आहे. आरोपी रिंकू पठाण आणि करिम लाला यांच्या माणसांना अटक का करता म्हणून एनसीबीवर उट्टं काढण्यात येत आहे. एनसीबीच्या विरोधात कट कारस्थान रचले जात आहे.
आज जे नाव समोर आले तो सुनील पाटील कोण आहे? सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही? त्याचा राष्ट्रवादीशी संबंध काय ? अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना संधी देतो. खरे सांगा नाही तर आता आमच्या हाताला बरेच काही लागले आहे. जर सत्य समोर आले तर तुम्हाला बाथरूमच्या आतमध्ये शौचालयात सुध्दा तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.
