Ads

--

राखी पाठवायची पण लाॅकडाऊन आहे ! Don’t worry आपले ‘पोस्ट’ आहे ना !

By Xtralarge News

July 31, 2020 3:25 pm

Ads

मुंबई, दि. 31 जुलै..

बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन दोन तीन दिवसांवर आला आहे.  यावेळी लाॅकडाऊन मुळे या सणावरही विरझणच पडले आहे. परंतु यातुनही मार्ग काढत रक्षाबंधन साजरा करू शकता. पोस्टाने राखी जलदगतीने पाठवण्यासाठी विशेष सोय केली आहे. या सेवेचा फायदा घ्या आणि आपल्या लाडक्या भावाला पोस्टाने राखी पाठवा..

दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील महाराष्ट्रातील डाक घरांत राखीसाठी राखी टपाल बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी टपाल सेंटर व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आले आहेत.
यावर्षी हा सण अधिक महत्वाचा आहे. कारण त्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे या सणासाठी भेट घेणे शक्य होणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेनमेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असतील. या कोविड काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे  आणि  “स्पीड पोस्ट  राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल” अशा घोषणावाक्याने आनंद देण्याची विभागाची इच्छा आहे.
राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवार) असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी पोहचण्यासाठी सर्व लोकांनी स्पीड पोस्ट सेवेचा फायदा घ्यावा.

No comments to show.

Leave a Comment