Ads

--

दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांना गोवण्याचे कारस्थान

By Xtralarge News

November 2, 2021 2:43 pm

Ads

दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजित पवारांना गोवण्याचे कारस्थान…

नवाब मलिक यांचा आयकर विभागाच्या कारवाईवर आरोप..

मुंबई दि. २ नोव्हेंबर :
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नाही. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या तरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजित पवारांचे नाव देणे योग्य नाही. भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते,असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

मलिक म्हणाले की, छगन भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल केले गेले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे यातून आम्ही घाबरुन जाणार नाही.

 

जो खेळ बंगालमध्ये सुरु होता, तोच खेळ आता महाराष्ट्रात केला जातोय. निवडणुकीच्या आधीही हा बदनामीचा खेळ सुरु होता. भाजपने नेत्यांवर दबाव टाकून पक्ष सोडण्यावर भाग पाडले. अनेक लोक भाजपमध्ये तेव्हा गेले, ते आता सांगतात की, आम्हाला आता शांत झोप लागते. यावरुनच संस्थांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. मात्र राज्य सरकार किंवा यातील एकही नेता अशा कारवाईंना घाबरणार नाही. अन्याय होतो आहे त्यावर लढा देऊ.

No comments to show.

Leave a Comment