Ads

-

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा वाटा मोठा

By Xtralarge News

October 31, 2021 11:57 am

Ads

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा वाटा मोठा

पुणे दि. 31 ऑक्टोबर :

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रामुळे बँकिंग, सहकारी साखर कारखाने, दुधसंघ, पतसंस्थाचे जाळे ग्रामीण भागात वाढले त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारली आहे. त्याप्रमाणे उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही अशीच प्रगती व्हावी यासाठी या क्षेत्रात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे महसूल मंत्री थोरात म्हणाले.

येरवडा येथे मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्या वतीने कोरोना कालावधीत तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून काम सुरू आहे. ऑनलाईन सातबारा, ऑनलाइन फेरफार, ई-पीक पाहणी याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी शासन काम करत आहे.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,  जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर,मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

 

No comments to show.

Leave a Comment