क्रुझवरील कॅटरिंगमध्ये ड्रग्ज कसे गेले?

0
FB_IMG_1634203721821

क्रुझवरील कॅटरिंगमध्ये ड्रग्ज कसे गेले?

गोंदिया दि. ३० ऑक्टोबर :
सोशल मिडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील ?…आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गोंदिया जिल्हयाच्या दौर्‍यावर असताना माध्यमांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला.

या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मिडियावर लाल गाठोडं दाखवत आहेत असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी नाव न घेता केला.

मी भंगारवाला आहे… अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे.?.. कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे?… त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या?…क्रुझवरील कॅटरिंगमध्ये ड्रग्ज कसे गेले?… आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे…इतकं का घाबरताय असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *