वीज कर्मचा-यांना 12 हजारांचे सानुग्रह अनुदान
वीज कर्मचा-यांना 12 हजारांचे सानुग्रह अनुदान
मुंबई, दि. 30 ऑक्टोबर:
राज्यातील वीज कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली आहे. दिवाळीसाठी महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांमधील वर्ग एक ते वर्ग चार श्रेणीतील सर्व नियमित कर्मचारी यांना १२ हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
डाॅ. नितीन राऊत पुढे म्हणाले की, सर्व सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यातील वीज कंपन्यासमोरील उभी आर्थिक आव्हाने, कोरोनाचे संकट, कोळसा टंचाई आणि थकबाकीचा डोंगर लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
प्रकाश आणि ऊर्जा विभाग यांचे अतूट नाते आहे.
राज्याचा ऊर्जा विभाग आणि त्या अंतर्गत कार्यरत सर्व कंपन्या मिळून राज्यात सदैव प्रकाशाचा उत्सव साजरा व्हावा म्हणून प्रयत्न करीत असतात. दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून सर्वच वीज कंपन्यांचे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत याची राज्य सरकारला जाणीव आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दीपावलीच्या माझ्याकडून व सरकारकडून हार्दिक शुभेच्छा..
