Ads

-

परमबीर सिंगविरोधात अजामीनपात्र वॉरंट

By Xtralarge News

October 28, 2021 8:28 pm

Ads

परमबीर सिंगविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर :
राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज्य सरकारने त्यांचे वेतन थांबवून फरार घोषीत करण्याची प्रक्रिया सुरु केले असताना ठाणे न्यायालयाने परमबीरसिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

परमबीरसिंग यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. त्यानंतर सिंग हे बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. अँटिलिया स्फोटक प्रकरणी आरोपी करण्यात आल्यानंतर परमवीर सिंग हे रजेवर गेले होते. तेव्हापासून ते परत आलेच नाहीत. परमबीरसिंग यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले मात्र ते हजर झाले नाहीत.

No comments to show.

Leave a Comment