20211008_111438

आर्यन खानला अखेर जामीन..

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर :
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर २६ दिवसांनंतर जामीन मिळाला. मुंबई हायकोर्टाने आर्यनला सशर्त जामीन मंजूर केला. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांनाही जामीन मंजूर केला आहे.

क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह त्याच्या सहकाऱ्यांनाही अटक केली होती. आर्यनसाठी सतीश मानेशिंदे, अमित देसाई आणि आता मुकुल रोहतगी हे बाजू मांडत होते. या सर्वातून आज अखेर २६ व्या दिवशी आर्यनला जामीन मंजूर झाला. आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांच्या जामीन अर्जांवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. ३ ऑक्टोबर रोजी या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रथम एनसीबी कोठडीत तर नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

एनसीबीच्या २२ अधिकाऱ्यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज पार्टी उधळली होती. या कारवाईत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी चौकशीनंतर सर्वप्रथम या तिघांना व नंतर अन्य पाच जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *