Ads

-

फसवणूक कुणी व कशी केली याचा खुलासा लवकरच होईल !

By Xtralarge News

October 28, 2021 11:29 am

Ads

फसवणूक कुणी व कशी केली याचा खुलासा लवकरच होईल !

दापोली दि. २८ ऑक्टोबर :
नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरीकांना छळण्यासाठी… बदनाम करण्यासाठी व नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला.

शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आलीय. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उकळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम ख-या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टिम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत त्या सत्य आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय असेही जयंत पाटील म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment