एनसीबीच्या ‘स्पेशल – २६’ चा नवाब मलिकांकडून पर्दाफाश
एनसीबीच्या ‘स्पेशल – २६’ चा नवाब मलिकांकडून पर्दाफाश.
मुंबई दि. २६ ऑक्टोबर :
समीर वानखेडे बद्दल आणखी एक धमाका करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक खळबळ उडवून दिली आहे. ‘स्पेशल -२६’ असे ट्वीट करुन नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकार्यांच्या बोगस कारवायांचा पर्दाफाश केला.
एनसीबीच्या अधिकार्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिलेले एक पत्र नवाब मलिक यांनी जाहीर केले या पत्रात वानखेडे आणि त्याच्या अधिका-यांनी मिळून लोकांना कसे फसवले याची सविस्तर माहिती दिली आहे.
समीर वानखेडे श्रीमंत व नामांकित व्यक्तिंना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून वसुली करत असे. काहींच्या घरी ड्रग्ज प्लँट करून अडकवायचा अशा काही प्रकरणांची माहिती या पत्रात आहे. हे पत्र म्हणजे वानखेडे यांच्या कृष्ण कृत्यांचा पाढा वाचणारेच आहे.
नवाब मलिक म्हणाले की , मी देशाचा जबाबदार नागरीक आहे, माझी जबाबदारी आहे की, हे पत्र एनसीबीचे अधिकारी जे समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी करत आहेत त्यांना पाठवणार आहे आणि पत्रात जे तथ्य आहे. विशेषतः ज्यांचा उल्लेख आहे त्यांचा या चौकशीत समावेश करावा अशी विनंती करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस आयुक्त आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही दिल्या आहेत असे सांगितले.
