Ads

-

लसीकरणात सहभागी झालेल्या डाॅक्टर, नर्स यांचा सन्मान

By Xtralarge News

October 21, 2021 4:01 pm

Ads

लसीकरणात सहभागी झालेल्या डाॅक्टर, नर्स यांचा सन्मान

मुंबई, दि. २१ आक्टोबर :

देशाने आज अखेर १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात लसीकरणात भाग घेतेल्या डाॅक्टर, नर्स आणि कर्मचारी अशा २२५ जणांचा प्रत्यक्ष भेटून सत्कार केला.

देशाने आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणात भाग घेतलेल्या कर्मचारी, डाँक्टर व नर्स यांचे आभार मानले आहेत. तेच अवचित्य साधून आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभेतील २२५ जणांना आज पुस्तक, पुष्पगुच्छ व कृतज्ञता प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकुण १० लसीकरण केंद्र सुरू असून एक कोविड वाॅररुम अशा ११ केंद्रातील कर्मचा-यांचा सन्मान आज करण्यात आला. यामध्ये महिला संघ सभागृह, सांताक्रूझ, सुर्या हाॅस्पिटल, रामकृष्ण मिशन रुग्णालय, जी. ए कुलकर्णी हायस्कुल, हार्मोनी लसीकरण केंद्र, बांद्रा भाभा रुग्णालय, जुना महापालिका दवाखाना वांद्रे, होली फँमिली रुग्णालय, रंगशारदा लसीकरण केंद्र आणि लिलावती रुग्णालयासह सुमारे २२५ कर्मचा-यांना आज सकाळ पासून प्रत्यक्ष भेटून आमदार आशिष शेलार यांनी सन्मानित केले. यावेळीी स्थानिक नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह भाजपा विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment