Ads

--

विधानसभा निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी !

By Xtralarge News

October 19, 2021 4:10 pm

Ads

विधानसभा निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी !

लखनऊ दि. १९ ऑक्टोबर :

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने महत्वाची व क्रांतीकारक घोषणा केली आहे. काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी ४० टक्के महिलांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत केली.

प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ४० टक्के उमेदवारी महिलांना देणार आहोत. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे, ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे, राज्याची प्रगती हवी आहे. महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील. महिलांना उमेदवारी जातीच्या आधारावर नव्हे, तर क्षमतेच्या आधारावर दिली जाईल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. महिला एकूजट होऊन एक शक्ती बनत नाहीए. कारण तिला जाती आणि धर्मात विभागले जात आहे.

महिलांना ४० टक्के उमेदवारीचा निर्णय घेऊन काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. जवळपास ५० टक्के मतदार या महिला असतात. या निर्णयाचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल का नाही हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच पण हा धाडसी व महत्वाचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध दिली आहे. इतर राजकीय पक्षावरही महिलांना जास्तीत जास्त उमेदवारी देण्यासाठी दबाव वाढू शकतो.

No comments to show.

Leave a Comment