Ads

--

भाजपला सत्तेची मस्ती !

By Xtralarge News

October 11, 2021 6:14 pm

Ads

भाजपला सत्तेची मस्ती !

मुंबई, दि. ११ ऑक्टोबर :
भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले.

लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली.

No comments to show.

Leave a Comment