‘एअर इंडिया’ पुन्हा ‘टाटा’कडे !

0
20211008_175741

‘एअर इंडिया’ पुन्हा ‘टाटा’कडे !

नवी दिल्ली, दि. ८ ऑक्टोबर :
सरकारी मालकीची विमान कंपनी ‘एअर इंडिया’ अखेर विकण्यात आली आहे. टाटा कंपनीला ही कंपनी विकण्यात आली आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली सरकारने स्वीकारली.

‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी सरकारकडे चार निविदा आल्या होत्या. यात ‘टाटा सन्स’ व ‘स्पाइसजेट’ हे आघाडीवर होते पण मोठी बोली लावणाऱ्या टाटांच्या हाती एअर इंडिया सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकार कडून एअर इंडियासाठी यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीची घोषणा आज करण्यात आली. टाटा सन्सचा १८००० कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. एअर इंडियावर ६० हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे.

‘एअर इंडिया’ सेवेची सुरुवात ही टाटांनीच केली होती, नंतर या सेवेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. आता ६८ वर्षांनंतर टाटांनाच याची मालकी पुन्हा मिळत आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केली होती. तब्बल ६८ वर्षांनंतर टाटा समूहाला मालकी हक्क प्राप्त झालेल्या एअर इंडियाचे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वागत केले आहे. टाटा समूहाचे द्रष्टे नेतृत्व असलेल्या जेआरडी टाटा यांच्या कारकिर्दीत एअर इंडियाला मिळालेलं गतवैभव पुन्हा प्राप्त करु, असा आशावाद रतन टाटा यांनी व्यक्त केला. आज आपल्यात जेआरडी असते तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता, अशा भावना टाटा यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या.

सरकारी मालकीच्या एक एक कंपन्या विकण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग आज एअर इंडिया विकण्यात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *