भारतात ‘स्टारलिंक’ हायस्पीड ब्रॉडबँड सेवा वर्षभरात !

0
20211001_191652

भारतात ‘स्टारलिंक’ हायस्पीड ब्रॉडबँड सेवा वर्षभरात !

मुंबई, दि. १ ऑक्टोबर:
जेफ बेझोस आणि इलोन मस्क हे जगातले प्रचंड श्रीमंत उद्योगपती आहेत. ते भारतात सॅटेलाइट आधारीत इंटरनेट सेवा सुरु करु इच्छित आहेत. हायस्पीड ब्रॉडबँड सेवा देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासंदर्भात त्यांनी भारताच्या दूरसंचार विभागाशी बोलणीही सुरु केलीयत. इलोन मस्क यांच्या स्टारलिंक आणि ऍमेझॉन ( ऑनलाइन रिटेलवाली ऍमेझॉन ) यांनी ही बोलणी केलीय. त्यांना अजून कसलाही परवाना मिळालेला नाही पण त्यांच्यासाठी ते अवघडही नाही.

भारतात कधी येणार ? असा प्रश्न एकानं ट्विटरवरुन विचारला होता. त्याला इलोन मस्क यांनी वर्षभरात असं उत्तर दिलं होतं. त्यानुसार ते येतायत. स्टारलिंकमध्ये भारतासाठीचे संचालक म्हणून संजय भार्गव हे आजपासूनच जॉइन झालेयत. ते आणि इलोन मस्क आधी पे पल कंपनीच्या संस्थापकांमध्ये होते.

बेझोस आणि मस्क भारतात आले तर रिलायन्स जिओ आणि एअरटेलसाठी प्रचंड आव्हान असेल. सध्या एअरटेलच्या सुनील मित्तल यांच्या भारती ग्लोबल कंपनीकडं सॅटेलाइट इंटरनेटचा परवाना आहे. पुढल्या वर्षापर्यंत सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरु करु असं त्यांनी आधीच घोषित केलंय.

काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी अमेरिकेच्या ह्युजेस नेटवर्कसोबत सामंजस्य करार करुन बड्या बड्या कंपन्या, सरकारी कंपन्या, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना सॅटेलाइट सेवा देण्यासाठी चर्चा सुरु केलीय.
पृथ्वीपासून एक हजार किमी उंचीवर असलेल्या सॅटेलाइटचा उपयोग करुन वेगवान इंटरनेट सेवा पुरवता येते. सोप्या भाषेत सांगायचं तर सध्या भारतात जिथं जिथं इंटरनेट कनेक्शन मिळत नाही तिथं तिथं इंटरनेटच्या चारही काड्या गडद दिसतील.

लडाख आणि हिमालयातले डोंगर, राजस्थानातलं वाळवंट आणि नक्षलवादी लपलेल्या जंगलातही दणक्यात यु ट्यूब चालेल. सध्या आपण सारेजण एमबीपीएस म्हणजे प्रतिसेकंद मेगाबाईट या वेगानं इंटरनेट सेवा वापरतो. सॅटेलाइटद्वारे मिळणारं इंटरनेट गिगा बाईट्समध्ये असेल. एमबीपीएसऐवजी जीबीपीएस. ऐकूनच धडकी भरेल. क्लिक करायला उशिर डाऊनलोड पूर्ण जाईल.

 

लेखक- श्री. गजानन कदम
वरिष्ठ पत्रकार, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *